रस्त्यावर थुंकणार्‍यांना आता ऑन द स्पॉट दंड

गुरूनाथ जाधव
सातारा, दि. 12 – घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 च्या तरतुदींचे अनुपालन न करणार्‍या व्यक्ती संस्थांना आता ऑन द स्पॉट दंड केला जाणार आहे. अ व ब वर्ग तसेच क व ड वर्गाच्या नगरपरिषदांकरिता दर आकारणी वेगवेगळी केली आहे.
रस्ते मार्गावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघवी करणे. उघड्यावर शौच करणे याचा समावेश आहे. याची अंमलबजावणी कडक स्वरूपात केली जाणार का हा प्रश्न आहे. त्याअनुषंगाने राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था शहरामधील नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकडून सेवा देत असताना नागरिकांकडूनही त्यास सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. परंतु जे नागरिक सहकार्य करीत नाहीत त्यांना घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मधील कलम 15 नुसार दंड आकारला जाणार आहे. याकरिता महानगरपालिका तसेच नगरपरिषदांनी उपविधी तयार करून सज्ज झाल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी व तरतुदींचे अनुपालन न करणार्‍या व्यक्ती संस्थांना दंड आकारणे आवश्यक आहे.
सदर नियम अंमलात येऊन 2 वर्षे झाली तरी राज्यातील बहुतांश नगरपरिषद, नगरपंचायतींनी अद्यापही याची अंमलबजावणी केल्याचे पहायला मिळाले नाही. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 312-अ, मधील तरतुदीनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या तरतुदीचे पालन न करणार्‍या संस्था व व्यक्तींना ऑन दि स्पॉट दंड करण्यासाठीचे दर शासनाने विहित केले आहे. दंड वसुलीचे अधिकार सर्व संबधित नागरि संस्थाचे आयुक्त मुख्याधिकारी यांना आहेत. आवश्यकतेनुसार हे अधिकार संबंधित नागरी संस्थेमधील अधिकारी व कर्मचारी यांना प्राधिकृत करण्याची तरतुद करण्यात आली आहे. सातारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा अवलंब सातारा शहरात लवकरच करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या भाग निरिक्षकांची टिम शहरातील विविध पेठा सार्वजनिक ठिकाणी ऑन दि स्पॉट दंड करणार आहेत. या कामी पारदर्शक कारभार होणे आवश्यक आसताना. स्वच्छ सातारा सुंदर साताराच्या दिशने सातारावासियांचे सहकार्य देखील मिळणे अपेक्षीत आहे. घाण म्हणजे ज्यापासून उपद्रव होऊ शकेल असे टाकाऊ पदार्थ धुळ. अस्वच्छ, परिस्थिती तसेच या नियमान्वये प्रतिबंधित करून. सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, जीवन व स्वास्थ यास बाधा होईल अशी अस्वच्छता होय. नागरिकांकडून घाण करणे म्हणजे सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)