रस्त्यावरील राडारोडा उचलण्याची मागणी

मोशी – येथील प्राधिकणामधील पेठ क्रमांक सहामधून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यालगतच्या सेवा रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे.

खोदकाम करुन अनेक महिने उलटले तरीही हा रोडारोडा उचलला नसल्याने येथून चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे हा राडारोडा लवकर उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मोशी-चिखली प्राधिकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांसाठी या रस्त्यांच्या कडेला पदपथालगत खोदकाम करण्यात आले आहे. मात्र हे खोदकाम फक्त वरच्यावर तात्पुर्त्या स्वरुपात बुजविण्यात आले आहे.

यापैकीच पेठ क्रमांक सहामधील बास्केट बॉल मैदानालगतच्याही सेवारस्त्यावर असेच खोदकाम करण्यात आले आहे. मात्र त्यामधून निघालेला राडारोडा या रस्त्यावर तसाच पडून असून, त्यामुळे नागरिकांना येथून होणाऱ्या वाहतुकीचा धोका पत्करुन या राडारोडायुक्त खडीवरुनच चालावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी हा रोडरोडा त्वरीत उचलण्याची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)