रस्त्यावरील पार्किंगही होणार “स्मार्ट’

स्मार्ट सिटी प्रशासनाने मागविले प्रस्ताव


जगभरातील पार्किंग पद्धतींचे करणार अवलोकन

पुणे – महापालिकेकडून शहरातील पाच रस्त्यांवर “पे अँड पार्क’ सुरू करण्यात येणार आहे. त्यातील एक रस्ता स्मार्ट पार्किंग म्हणून विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने पालिकेकडे रस्त्याची मागणी केली आहे. या रस्त्यावर स्मार्ट पार्किंग योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीने देशभरातील पार्किंगवर काम करणाऱ्या संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या अंतर्गत सुमारे 16 प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

महापालिकेकडून शहरातील रस्त्यांवर राबविण्यात येणाऱ्या “पे अँड पार्क’ योजनेवरून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. पालिकेने रस्त्यांवर ही योजना राबविल्यास त्या अंतर्गत नागरिकांची लूट होणार असून “पार्किंग माफिया’ निर्माण होतील, अशी टीका केली जात आहे. मात्र, असे असतानाच जगभरात तसेच देशातही काही ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी हस्तक्षेप रहित “ऑन स्ट्रीट पार्किंग’ योजना राबविल्या जातात. त्यात संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावरील नेमकी जागा, वाहनांची संख्या निश्‍चित करून त्यानुसार सेन्सर्स तसेच इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्किंग सुविधा दिली जाते. त्यात पैसेही ऑनलाइन पद्धतीनेच घेतले जातात. याच धर्तीवर शहरातील प्रमुख रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर अशा प्रकारे “ऑन रोड स्मार्ट पार्किंग’ राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी 16 प्रस्ताव आले आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)