रस्त्यावरचे अपघात (भाग 2)

डॉ. श्‍याम अष्टेकर 

अपघातावेळी योग्य तो प्रथमोपचार देऊन जखमीस ताबडतोब रुग्णालयात पोहोचवावे. छातीच्या,पोटाच्या व डोक्‍याच्या जखमा फसव्या असतात, कारण आतील अवयवांना इजा झाली आहे की नाही हे कळणे सोपे नसते. वेळीच या गोष्टी कळल्या नाहीत आणि उपचारांना उशीर झाला तर मृत्यूही येऊ शकतो. 

लहान मुलांचे अपघात 
साधारणपणे एक वर्षानंतर मुलांची हालचाल एकदम वाढते. मुलांच्या सभोवतालच्या परिस्थितीत अनेक धोकादायक गोष्टी असल्यास अपघातांचे प्रमाण वाढते. एक वर्षावरील मुलांच्या मृत्यूंचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. या अपघातांत अनेक प्रकार येतात. भाजणे (स्वयंपाकघरात), फटाक्‍यांचे अपघात, बुडणे, झाडावरून पडणे,साप-विंचू चावणे, पडून मार लागणे,गुरांमुळे होणा-या जखमा, विजेचा शॉक वाहनांखाली सापडणे, औषधे किंवा विषारी पदार्थ पोटात जाणे,खेळताना झालेल्या जखमा, किडा खडू इत्यादी नाका-कानात जाणे धारदार वस्तूंमुळे जखमा होणे खेळामध्ये टोकदार वस्तू लागणे इत्यादी अनेक अपघात यात येतात. यांतल्या अनेक घटना जीवघेण्या ठरू शकतात. असे अपघात होऊ नयेत म्हणून अनेक प्रकारे काळजी घ्यावी लागते. मुलांकडे व त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष असणे आवश्‍यक आहे. अनेक कुटुंबांत मुलांना लहान भावंडांकडे सोपवून रोजगारासाठी बाहेर पडावे लागते. यामुळे अपघात होत राहतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घर व घराभोवतालच्या परिसरात धोकादायक गोष्टी मुलांपासून दूर किंवा हाताबाहेर आहेत याची खात्री करायला पाहिजे. उदा. औषधे किंवा विषारी बाटल्या उंच ठिकाणी असणे, चाकू-कात्री खाली न राहणे, आजूबाजूला टाकी, उघडी डबकी किंवा खड्डे नसणे,मुलांच्या खेळण्यांत धारदार वस्तू नसणे, इत्यादी अनेक गोष्टी पाहणे आवश्‍यक असते. अशी दक्षता घेतली तरच मुलांचे अपघात टळू शकतील. फटाक्‍यांचा मोह टाळल्यास काही अपघात टळतील. तसेच बालमजुरीचीही मागणी कमी होईल. शेती व्यवसायातील अनेक कामांमध्ये अपघातांची शक्‍यता असते. चांगली काळजी घेता आली तर त्यातले काही अपघात टळू शकतील. उरलेले काही अपघात टाळण्यासाठी मात्र जास्त व्यापक उपाययोजना लागेल.

अपघातांचे वर्गीकरण 
यंत्रामुळे होणा-या जखमा :कापणी यंत्रे, डिझेल इंजिने, ट्रॅक्‍टर यांच्या वापरातील अपघात, विद्युत धक्का.
जनावरांमुळे होणा-या जखमा :
विशेषतः शिंगाने होणाऱ्या जखमा. साप, विंचू,इत्यादींचे विषारी दंश.
विषारी किटकनाशकांमुळे होणारे विषबाधेचे अनेक प्रकार.
विहीर खोदाईसंबंधी अपघात.

या यादीतल्या सगळयाच अपघातांची चर्चा करण्याची आवश्‍यकता नाही. पण काही मुद्दे खालीलप्रमाणे:

सदोष यंत्रे सदोष यंत्रे हा एक मोठा प्रश्न आहे. कापणीयंत्राच्या बाबतीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गहू कापणी कामगारांत हे अपघात विशेष प्रमाणात आढळतात. हात, बोटे तुटणे हा एक फारच गंभीर अपघात आहे. साप, विंचू दंश साप, विंचू, इत्यादी विषारी प्राण्यांच्या दंशाचे प्रमाण खूप आहे. आपल्या समाजात बूट, हातमोजे वापरण्याची पध्दत नाही. बूट, हातमोजे घातल्यास यातले निम्म्याहून अधिक अपघात सहज टळतील. हे बहुतेक अपघात संध्याकाळी, पहाटे या वेळेत होतात;म्हणून चांगली बॅटरी पाहिजे. योग्य उपचार ताबडतोब मिळाले तर यातले 90% मृत्यू टळू शकतात.

उष्माघातावर व्यवस्थापन 
उष्माघातात लवकरात लवकर शरीरातील जादा उष्णता काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच महत्त्वाचा प्रथमोपचार आहे. त्यासाठी रुग्णास तातडीने सावलीत नेणे, ओली चादर अंगावर टाकून वारा घालणे हे ताबडतोब करण्याचे उपाय आहेत. शक्‍य असल्यास रुग्णास थंडगार पाण्यात थोडा वेळ ठेवावे. रुग्णाच्या शरीराचे तापमान थोडे कमी झाल्यावर त्याला बाहेर काढावे. याबरोबरच हातपाय चोळावेत म्हणजे रक्ताभिसरण सुधारते. प्रथमोपचारानंतर मात्र रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेवून औषधोपचार सुरु करणे गरजेचे आहे.
औषधांच्या परिणामामुळे झालेल्या उष्माघातावर उपचार म्हणून पॅरासिटॅमॉल, सस्पिरिन सारख्या ताप कमी होण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधांचा वापर करू नये. उष्माघात झालेल्या व्यक्तीने थंड पाण्याच्या टबमध्ये शरीर बुडवण्याने शरीरातील उष्णता कमीतकमी वेळात बाहेर पडते. हा उपाय तारतम्याने करावा लागतो. टबातील पाणी अति थंड असल्यास रुग्णाच्या त्वचेलगतच्या रक्तवाहिन्या संकोचतात आणि शरीरातील उष्णता बाहेर येण्यात अडथळा निर्माण होतो. प्रायोगिक स्वरूपामध्ये उष्माघात स्थितीपर्यंत असलेल्या रुग्णास थंड पाण्यात बुडवण्याने पुढची गंभीर स्थिती येत नाही. शरीराचे तापमान 40 सेल्सियस होऊन व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार करावे लागतात.

रुग्णालयामध्ये सलाईन लावणे, जठरामध्ये नळी टाकून आतील द्रव बाहेर काढणे आणि जठरात शीत सलाइन नळीवाटे देणे आणि तातडीच्या उपायामध्ये रक्ताचे तापमान कमी करण्यासाठी डायलिसिस वर रुग्ण ठेवणे अशा उपायांचा समावेश होतो. उष्माघात होऊ नये यासाठी सोबत मान आणि डोके झाकेल असा मोठा पांढरा रुमाल किंवा पंचा, पूर्ण अंगभर शक्‍यतो सुती कपडे वापरावेत. कमीत कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, शक्‍यतो तीव्र उन्हात जाणे टाळावे, जवळ पाण्याची बाटली ठेवावी, दर अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी प्यावे, अधून-मधून बर्फ न टाकलेले लिंबू पाणी प्यावे. अशा छोट्या उपायांनी व योग्य जीवनशैलीने आपण उष्माघात टाळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)