रस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर कारवाई

वाघोली- बाईफ रस्त्यावरील बगाडे ज्वेलर्स समोर बुधवारी (दि.10) रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाढदिवस साजरा करून शांततेचा भंग करणाऱ्या 7 तरुणांवर लोणीकंद पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई केली आहे. पंधरा दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी बीजेएस कॉलेजजवळ अशाप्रकारे 9 जणांवर कारवाई केली होती. बुधवारी (दि.10) रात्री 7 जणांवर करण्यात आल्याने ही लोणीकंद पोलिसांची दुसरी मोठी कारवाई आहे. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी रात्रीचा वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असतानाच पुन्हा कारवाई केली आहे. त्यामुळे आता तरुणांमध्ये धडकी भरली आहे. लोणीकंद पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे. तसेच ही कारवाई सातत्याने सुरूच ठेवून बेशिस्त तरुणांना लगाम लावावा, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)