रस्त्याच्या कारणावरुन दोन गटात मारामारी

मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील लांडेवाडी-शेवाळेमळा येथील रस्त्याच्या कारणावरुन दोन गटात झालेल्या मारामारीप्रकरणी आठ जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटांनी एकमेकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत भरत शेवाळे यांनी म्हटले आहे की, लांडेवाडी शेवाळेमळा येथील गट नंबर 174 मधील 5 गुंठे जमीन आमच्या हिस्यास आलेली आहे. शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरुन आरोपी शिवाजी रभाजी शेवाळे, जितेंद्र शिवाजी शेवाळे, राजेंद्र शिवाजी शेवाळे, रेश्‍मा जितेंद्र शेवाळे यांनी अडवणूक करुन प्रतिबंध केला. त्यावेळी विचारणा केली असता त्यांनी शिविगाळ करून दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी टी. एम. मोरे करीत आहेत.
तसेच मंचर पोलीस ठाण्यात जितेंद्र शिवाजी शेवाळे यांनी देखील फिर्यादी दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, लांडेवाडी-शेवाळेमळा येथील जमीन गट नंबर 174 मधून माझ्या हिस्यास आलेली 10 गुंठे जमिनीतून जाणारा रस्ता आहे. आरोपी भरत रभाजी शेवाळे, सुमन भरत शेवाळे, अंकुर भरत शेवाळे, प्रियंका अंकुर शेवाळे यांनी अडवणूक करून प्रतिबंध केला. तसेच आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ए. बी. मडके करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)