रस्त्याच्या कामासाठी अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या

संगमनेर : विरगाव फाटा ते गणोरे रस्त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जालिंदर वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात ठिय्या दिला.

अकोले तालुक्‍यातील विरगाव फाटा ते गणोरे रस्त्याचा प्रश्‍न
जालिंदर वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

संगमनेर, (प्रतिनिधी) – अकोले तालुक्‍यातील विरगाव फाटा ते गणोरे रस्त्यास प्रसासकीय मान्यता असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप कामास प्रारंभ न केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांच्या दालनात ठिय्या दिला.

राज्य मार्ग क्र. 20 विरगाव ते संगमनेर या रस्त्याचे वीरगाव फाटा ते गणोरे (ता. अकोले) हद्दी पर्यंतच्या रस्त्यास मार्च 2017 ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा सव्वाआठ किलोमीटर रस्ता मंजूर आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश जुलै 2018 मध्ये देऊनही कामास सुरवात झालेली नाही. या रस्त्याची दूरवस्था झाल्याने जनतेचे मोठे हाल होत आहेत.

आज (दि. 13) दुपारी देवठाण गटाचे जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे व भाजप कार्यकर्त्यांनी संगमनेर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय पवार यांचे समोर गांधीगिरी करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी पवार यांनी ठेकेदाराशी संपर्क साधून 18 नोव्हेंबरपासून काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.

यावेळी भाजप तालुका संघटन सरचिटणीस ऊसाहेब वाकचौरे, माधव ठुबे, किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष सूर्यभान दातीर, ईश्‍वर वाकचौरे, सावळेराम गायकवाड, किसन आंबरे, डॉ. अविनाश कानवडे, वाल्मीक देशमुख, सुनील उगले, डॉ. सचिन दातीर, मदन आंबरे, हरिदास माने, प्रवीण सहाणे, रवी घुले, गणेश उगले, गणेश पवार, नानासाहेब खतोडे, बाळासाहेब दातीर, सूर्यभान आहेर, बाळासाहेब आहेर आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)