रस्त्याकडेच्या कचरा डेपोमुळे सर्वत्र दुर्गंधी

तळमावले-कुंभारगाव रस्त्यावरील प्रकार

ढेबेवाडी – ढेबेवाडी विभागाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या तळमावले, ता. पाटण येथील तळमावले-कुंभारगाव या रस्त्याच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेच्या लगतच कचरा डेपो केला असून याठिकाणी संबंधितांकडून शिळे अन्न, प्लॅस्टिक पिशव्या, चिकन सेंटरमधील टाकाऊ भाग, कुजलेला भाजीपाला अशाप्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

कुंभारगाव खोऱ्यात जाणाऱ्या मुख्य मार्गावरच सुमारे बारा वाड्या-वस्त्यांमधील लोकांची ये-जा सुरु असते. रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर प्रवाशी वाहतुकही मोठ्या प्रमाणात सुरु असते. याच रस्त्यालगत घोटील गावठाण वसले असल्याने या गावाचीही वाहतूक याच रस्त्यावरुन सुरु असते. मात्र या रस्त्यावर हॉटेल व्यवसायिक, दुकानदार, चिकन सेंटरवाले बिनधास्तपणे कचरा फेकत आहेत. या कचऱ्यामध्ये शिळे अन्न, टाकाऊ खाद्य पदार्थ, मांसाचे भाग टाकले जात आहेत. यामुळे याठिकाणी भटक्‍या कुत्र्यांची टोळकी जमा होत असून याचीही मोठी दहशत या रस्त्यावर पहावयास मिळते.

कचरा डेपो खचाखच भरल्याने हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर येवू लागला आहे. त्यामुळे याचा त्रास या मार्गावरुन जाणाऱ्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनीं तसेच नागरिकांना सहन करावा लागत आहे. या कुत्र्यांच्या टोळक्‍यांकडून विद्यार्थी तसेच नागरिकांवर हल्ले होण्याचेही प्रकार होत आहेत. वांग-मराठवाडी पुनर्वसित घोटील गावठाणातील नागरिकांना रात्री -अपरात्री या रस्त्यावरुन ये-जा करावी लागते. याठिकाणी दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने भितीचे वातावरण निर्माण होत आहे. या कचऱ्याची ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावून दिवाबत्तीची सोय करावी, अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)