रस्त्यांवर राहणाऱ्या बालकांना आधार कार्ड देण्यासाठी मोहीम 

मुंबई :  निर्भया प्रकरणानंतर महिला आणि मुलांवरील अत्याचाराबाबत समाज फार संवेदनशील झाला आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रन’सारख्या संस्थाही या प्रश्नावर व्यापक कार्य करीत असून त्यांच्या शिफारशींचा धोरण ठरविण्यात निश्चितच उपयोग होत आहे. रस्त्यांवर राहणाऱ्या बालकांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी बाल हक्क आयोगामार्फत मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांनी दिली.

स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून या कामाला व्यापक स्वरुप देऊन रस्त्यांवर राहणाऱ्या वंचित बालकांसाठी व्यापक कार्य केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल, बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास, ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख संजय शर्मा, सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेती सालेहा खान आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)