रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद

File Photo

मुंबई : नवीन रस्त्यांच्या बांधकामासाठी हायब्रीड ॲन्युईटीसाठी केलेली 3 हजार कोटी रुपयांची तरतूद पुरेशी असून येत्या ऑक्टोबरच्या दरम्यान या रस्त्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, रस्‍त्यांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा आराखडा तयार केला आहे. गेल्या दोन  वर्षात रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले असून आता खड्ड्यांच्या संख्यानिहाय निविदा (टेंडर्स) काढण्यात येत आहेत. तसेच 10 कि. मी. च्या आत टेंडर निघणार नाही हा निर्णय  घेतला. त्यामुळे टेंडर्सची  संख्या कमी झाली आहे. ग्रामीण रस्त्यांची लांबी 2 कोटी 56 लाख कि.मी. इतकी मोठी असून त्यांच्या दुरुस्तीच्या व दर्जावाढीच्या अनुषंगाने वेगळे धोरण ठरवावे लागेल.

रस्ते निर्मितीसाठीच्या हायब्रीड ॲन्युईटीसाठी 3 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विस्तृत प्रकल्प अहवालानुसार एका कि.मी. साठी 3 कोटी रुपये याप्रमाणे 10 हजार कि.मी. साठी 30 हजार कोटीं रुपयांची आवश्यकता राहील असे गृहीत धरण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तेवढा खर्च येणार येणार नाही. त्यामुळे प्रत्यक्षात निर्माण करायच्या रस्त्यांच्या लांबीत वाढ होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)