रस्त्यांची कामे करताना पोलीस परवानगीची गरज नाही : पालिका

संग्रहित छायाचित्र

पुणे- विकासकामे अथवा रस्त्यांची कामे करताना; पोलिसांच्या परवानगी घेणे बंधनकारक नसल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, एखाद्या मुख्य रस्त्यावर काम करताना रस्त्याच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता म्हणून याची माहिती पोलिसांना देणे आवश्‍यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगरसेविका पल्लवी जावळे यांनी याबाबतचा प्रश्‍न एप्रिलच्या मुख्यसभेच्या प्रश्‍नोत्तरात उपस्थित केला होता. त्यावर महापालिका प्रशासनाकडून हा खुलासा देण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण, केबलसाठी खोदाई तसेच इतर रस्त्याशी संबधित कामे केली जातात. अशा वेळी अनेकदा पोलिसांकडून ही कामे वाहतुकीचे कारण पुढे करत थांबविली जातात. तर काही दिवसांपूर्वी महापालिकेने पुणे स्ट्रीट प्रोग्रामअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर पदपथाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेने या कामाबाबत पोलिसांना कळविले होते.

मात्र, त्यांच्याकडून काम करण्यास नकार देण्यात येत असल्याचे चित्र होते. त्यामुळे जावळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नामुळे शहरातील कोणत्याही विकासकामासाठी अथवा रस्त्याच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची आवश्‍यकता नसल्याचे प्रशासनाच्या या उत्तरामुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याच वेळी, एखाद्या रस्त्याच्या कामासाठी वाहतूक वळवायची असल्यास अथवा त्यात काही बदल करायचे असल्यास त्यासाठी वाहतूक विभागास कळविणे आवश्‍यक असल्याचेही प्रशासनाने उत्तरात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)