रस्ते विकास अनुदानाचा वनवास संपेना

एकाच रस्त्याचा नारळ कसा फुटला?

सातारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या रस्ते विकास अनुदानाच्या खर्चासाठी दिवाळीचा मुहुर्त शोधण्यात आला आहे. सातारा पालिकेने वाट्याला आलेल्या दीड कोटीपैकी सातारा शहरातील सात रस्त्यांच्या फेरनिविदा काढून खड्डेमुकत सातारा करण्याचा आटापिटा चालवला आहे.

तब्बल लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष दिवाळीत कामाला सुरवात होणार होती मात्र साताऱ्यात ठराविक रस्त्यावरच डांबर पडू लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सातारा शहरात गेल्या पाच वर्षात तब्बल बत्तीस कोटी रुपये रस्त्यांसाठी डागडुजीसाठी खर्च करण्यात आले आहेत. मात्र पोवई नाक्‍यावर सुरू झालेले ग्रेड सेपरेटरचे काम सातारा शहरात पावसाने शहरातील प्रमुख तीन रस्त्यांसह सेवा मार्गाची उडवलेली दैना, भुयारी गटार योजनेची गडबड यामुळे सातारा शहर आणि उपनगरांचा संपर्क अगदीच तुटल्या सारखा झाला आहे.

कोटेश्‍वर पुलाचा नारळ फुटला मात्र शाहूपुरीकरांना बदामी विहरीकडून वळसा घालण्याची वेळ आल्याने संतापाचे वातावरण आहे. अर्कशाळा नगरमध्ये सुध्दा भुयारी गटार योजनेचे सुरू झालेले काम अडचणीचे ठरू लागले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने अर्कशाळा नगर परिसरात अक्षरश: दलदलीचे साम्राज्य झाले होते. मात्र चिखलाने आता पोपडे धरल्याने दुचाकी चालवणे दुरापास्त झाले आहे. मात्र दिवाळीपर्यंत हा पूल पूर्ण करण्याचे आश्‍वासन नगरसेवक किशोर शिंदे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या अनुदानाचा वनवास भाजप व सातारा विकास आघाडी यांनी सोयीस्कररित्या संपवला आहे. दीड कोटी रूपये आता पदरात पाडून साताऱ्यातील सात रस्त्यांच्या फेर निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये बांधकाम सभापती मनोज शेंडे यांच्या वॉर्डातील दोन रस्त्यांचा समावेश आहे. यामध्ये अर्कशाळा नगर ते गजानन महाराज मंदिर मार्ग, जांभळी चौक ते बुधवार नाका तसेच सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील मुख्य चार व दुर्गा पेठेतील एका रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची निविदा अंदाजे तीन ते दहा लाख रुपयापर्यंतची आहे.

 

शाहूपुरीवासियांचा अजुनही वळसा
कोटेश्‍वर पुलाचा वनवास संपेना कोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने शाहूपुरी व सातारा यांचा संपर्क तुटला आहे. येथील पुलानजीकच्या पाण्याच्या पाईपलाईन हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर जूना पुल पाडून नवीन बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कोटेश्‍वर पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी सातारकरांना किमान दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार होती. मात्र अद्याप पूलच पूर्ण न झाल्याने शाहूपुरीकरांचा साताऱ्याचा वळसा संपलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)