रस्ते अपघात तरूणाईसाठी ठरत आहेत जीवघेणे

मृतांमध्ये 18 ते 35 वयोगटातील तरूणांचे प्रमाण 65 टक्के
नवी दिल्ली – देशातील तरूणाईसाठी रस्ते अपघात शब्दश: जीवघेणे ठरत आहेत. देशभरात घडणाऱ्या रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 18 ते 35 वयोगटातील तरूणांचे प्रमाण तब्बल 65 टक्के इतके आहे.

ही माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. लोकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये. तसेच, वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीवर बोलू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बहुतांश अपघात घडणारी देशातील महामार्गांवरील 786 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही ठिकाणी 50 हून अधिक अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्रुटी दूूर करण्यासाठी त्या ठिकाणी योग्य रस्ते अभियांत्रिकीची प्रक्रिया केली जात आहे, असे गडकरी यांनी सांगितले. मोटर वाहन विधेयकामुळे प्रवाशांच्या बहुतांश समस्या संपुष्टात येतील. ते विधेयक वर्षभरापासून राज्यसभेत प्रलंबित आहे. ते मंजूर करण्यासाठी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)