रस्ता सुरक्षेच्या जनजागृतीसाठी टी-20 क्रिकेट सामना – रावते

24 मार्च रोजी वानखेडेवर रंगणार सामना

मुंबई – रस्ता सुरक्षेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्‍यक असून परिवहन विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘नो हॉंकिंग प्लीज’ हे अभियान राबविले जात असून रस्ता सुरक्षेच्या जनजागृतीसाठी वानखेडे स्टेडियमवर 24 मार्च रोजी ट्‌वेंटी ट्‌वेंटी क्रिकेट सामना खेळविला जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी आज विधानभवनात दिवाकर रावते यांची भेट घेतली. त्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना रावते यांनी माहिती दिली. परिवहन विभागाकडून राज्यभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहेत. हिंदुस्थानात दरवर्षी दीड लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात. यातील 20 ते 22 हजार लोक एकट्या महाराष्ट्रात मरण पावतात. त्यामुळे रस्ता सुरक्षेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्‍यक असल्याचे रावते यांनी सांगितले.

24 मार्च रोजी होणारा क्रिकेट सामना हा त्यातीलच एक भाग आहे. यामध्ये दोन संघ असणार असून यातील एका संघाचे नाव ‘रस्ता सुरक्षा’ तर दुसछया संघाचे नाव ‘नो हॉंकिंग प्लीज’ असे असणार आहे. या क्रिकेट सामन्यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू सहभागी होणार असून क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेची जनजागृती केली जाणार आहे, असे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)