रस्ता सुरक्षा अभियान नूतनमध्ये संपन्न

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रबोधन कार्यक्रम पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकताच संपन्न झाला.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन मंडळाचे आनंद पाटील, परिवहन अधिकारी सचिन विधाते, सहायक निरीक्षक संदीप गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे विश्‍वस्त महेशभाई शहा, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, डॉ. ललितकुमार वधवा, प्रा. शैलेंद्र मोरे, विद्यार्थी विकसन अधिकारी प्रा. विजय नवले आदी यावेळी उपस्थित होते.

वाहतुकीचे नियम हे स्वतःसाठी तसेच इतरांसाठी अत्यंत उपयोगाचे असतात म्हणून ते पाळावेत. अपघातामुळे मोठी हानी होते. पादचाऱ्यांनी पादचारी मार्गाचा वापर करावा तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, तर चारचाकी चालकांनी सीट बेल्ट शिवाय वाहन चालवू नये’, असे प्राथमिक पण महत्वपूर्ण मुद्दे आनंद पाटील यांनी उदाहरणांसह विशद केले.

अपघातातून होणारे मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. अनेक अपघातांचे कारण वाहनचालक असतात आणि नियम तोडल्यास अपघाताची शक्‍यता वाढते. वाहनचालकाने सुज्ञपणा दाखवल्यास आणि शिस्तीचा अवलंब केल्यास अपघात टाळणे शक्‍य आहे. रस्त्यावरची पहिली चूक ही आयुष्यातील शेवटची चूक असू शकते’, असे सचिन विधाते यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. विजय नवले यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. अर्चना भसे यांनी केले. प्रा. रामदास बिरादार यांनी आभार मानले. प्रा. हृषीकेश पांडे, सोमनाथ शेंडगे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)