रस्ता रुंदीकरणाबाबत नगरपरिषदेवर ग्रामस्थांचा मोर्चा

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांना निवेदन देण्यात आले.
  • रस्ता रुंदीकरणाचा तिढा : शहर सुधारणाला निवेदन

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – येथील तळेगाव दाभाडे गावठाणातील रस्ता रूंदीकरणाबाबत नगरपरिषद करत असलेल्या मनमानी कारभाराविरोधात तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी व नागरिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, विशाल दाभाडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, दत्तात्रेय गुंड, संतोष गुंजाळ, आनंद भेगडे, संजय पटवा, भरत मेहता, राजू लोहोट, दिनेश वाडेकर, दिलीप यादव, निहाल सोलंकी, पोपट जगनाडे, देवेंद्र शहा, रजनीकांत जव्हेरी, किसन आबाजी भेगडे, सूर्यकांत जव्हेरी, सतीश ओसवाल, राजू जव्हेरी, दीपक रामभाऊ भेगडे, चेतन पटवा, भालचंद्र यादव, सुभाष ओसवाल, सचिन ओसवाल यांच्यासह व्यापारी व महिला सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, व्यापाऱ्यांचा मोर्चा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आला. तेथे ठिय्या आंदोलन सुरू केले. मोर्चकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी स्वीकारले. रस्ता रूंदीकरणामुळे तळेगावची बाजारपेठ उध्वस्थ होणार असल्याचा दावा करत रस्तारूंदीकरणाचे काम त्वरित थांबविण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. या वेळी किशोर भेगडे म्हणाले की, रूंदीकरणामुळे येथील व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांच्या इमारती पाडाव्या लागणार आहेत. रस्ता रुंदीकरणाची आवश्‍यकता नसून, नगरपालिकेने मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, रस्त्याचे बाधित क्षेत्र काढण्यापूर्वी संबंधित जागा मालकास विश्‍वासात घेण्यात येईल. तसेच बांधकामाच्या स्वरूपानुसार जागा मालकास पुरेसा अवधीही देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

नगरसेवक संतोष भेगडे म्हणाले की, काही बड्या राजकीय लोकांना टाऊनशीपसारखे प्रकल्प उभारायचे असल्याने रस्ता रूंदीकरणाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या इमारतीवर हातोडा घालू नये. अन्यथा तळेगाव बंद करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)