रस्ता धोकादायक

कृष्णानगर गेट नंबर दोन समोरील

सातारा – सातारा सोलापूर महामार्गावर कृष्णानगर (सातारा) येथील गेट नंबर दोन समोर छोट्या मोठ्या अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्या पूर्वीच बांधकाम विभागाने त्या ठिकाणी डिव्हायडर बसवावा अन्यथा भाजप तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील लोखंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

स्वप्नील लोखंडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा नगर गेट नंबर दोनच्या आत कृष्णा खोरे महामंडळाची विविध कार्यालय कार्यरत आहेत. तेथून हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद शाळा आहे. या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी कृष्णानगर, संगमनगर, वनवासवाडी आदी भागातून सायकल वरून विद्यार्थी-विद्यार्थिनी येत असतात. गेट नंबर दोन च्या समोर चौक असून या चौकातून वनवासवाडी येथील नागरिक ये-जा करीत असतात. येथूनच शाळेसाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची ये-जा सुरू असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा-सोलापूर या महामार्गाचे काम उत्कृष्ट झाल्याने या मार्गावरून चार चाकी, दुचाकी वाहने बेभानपणे वेगाने पळवली जात आहेत. या चौकातच कोरेगाव मार्गाला तीव्र उतार असल्याने वेगावर नियंत्रण मिळवणे वाहनचालकांना शक्‍य होत नसल्याने या ठिकाणी छोट्या-मोठ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन वर्षापूर्वी या चौकानजीक चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर हे ठिकाण अपघात क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. वारवार वाहनचालकांना सूचना करूनही सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन कृष्णानगर गेट नंबर दोनच्या पुढे तात्काळ डीव्हाडर कार्यान्वित करावा. नेमकी अशीच परिस्थिती नाझिया कलेक्‍शन या दुकानासमोरील चौकामध्ये निर्माण झाली आहे. या ही चौकात डिव्हायडर नसल्याने सातत्याने अपघात घडत आहेत त्यामुळे या ठिकाणीही डीवाईडर असावेत अन्यथा विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हितासाठी भाजपा विद्यार्थी आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)