रस्ता दुरूस्तीची पोलखोल!

रस्त्याकडेचा कचरा काढणे, ती जागा स्वच्छ करून त्यावर डांबर मजबूत होण्यासाठी खड्डे दुरूस्तीसाठी वापरले जाणारे इमल्शन टाकणे आवश्‍यक होते. तसे न करता या बिगाऱ्यांनी थेट डांबर टाकून खड्डा बुजविला.

 

पुणे :  पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याची आता मलमपट्टी अतिशय निकृष्ट केली जात असल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नगर रस्स्त्यावर दिसून आला. खड्डे बुजविताना, चक्क मातीआणि कचऱ्यावरच डांबर टाकून ही दुरूस्ती केली जात आहे.
थातूरमातूर डागडुजीचे हे काम रस्ता महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर हा प्रकार सुरू आहे, ही यातील धक्‍कादायक बाब आहे. येथील टॅंकर भरणा केंद्रासमोरील बाजूस गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदाई झाल्याने खड्डे पडले होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहने रस्त्याकडेने जाताना त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यावेळी रस्त्याकडेचा कचरा काढणे, ती जागा स्वच्छ करून त्यावर डांबर मजबूत होण्यासाठी खड्डे दुरूस्तीसाठी वापरले जाणारे इमल्शन टाकणे आवश्‍यक होते. तसे न करता या बिगाऱ्यांनी थेट डांबर टाकून खड्डा बुजविला.

कामगार म्हणतात…
या थातूरमातूर रस्ते दुरुस्तीबाबत येथील कामगारांकडे विचारणा केली असता, “खड्डे भरताना आधी टाकावे लागणारे इमल्शन संपले आहे. त्यामुळे हे डांबर आणि खडी रस्त्यावर टाकत आहे. रोडरोलर नंतर येणार आहे,’ असे ते म्हणाले.

-Ads-

यावेळी त्यांच्याकडे “रोड रोलर नाही का?’ असा प्रश्‍न विचारला असता, “तो इतरत्र असून नंतर येऊन तो काम करून जाईल,’ असे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेकडून पावसाळयापूर्वी रस्ते दुरूस्ती आणि त्यानंतर आता खड्डे दुरूस्तीच्या कामाची पद्धत पाहता नागरिकांच्या पैशांचीच उधळपट्टी कशा प्रकारे केली जात आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

प्रत्यक्ष पाहणीवेळी काय दिसले?
पथ विभागाने या रस्ता दुरूस्तीसाठी डांबर भरलेली गाडी क्रमांक एम.एच. 11 -ए. 3361 येथे थांबली. त्यानंतर काही कर्मचारी रस्ता दुरूस्तीसाठी खाली उतरले, त्यात एक ड्रायव्हर अणि दोन बिगाऱ्यांचा समावेश त्यांनी डांबर रस्त्यावर टाकून लगेच ते खड्डयात भरण्यास सुरूवात केली.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)