रस्ता खचला; वाहतुकीचे “तीन तेरा’

पुणे – नदीपात्रातील रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्ड्याशेजारील रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले. यावेळी रस्त्यावरील वाहतूक सुरू होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

नदीपात्रातील पुलाखाली सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याठिकाणी मेट्रोचे पीलर टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी पुलाखाली रस्त्याला लागूनच खड्डा खोदण्यात आला होता. तसेच, खड्ड्यामध्ये बोअरवेल घेण्यात आला असून बाजूने बॅरीगेट्‌स लावण्यात आले आहेत. बॅरीगेट्‌सशेजारून ये-जा करण्यासाठी रस्ता खुला असतानाच रस्त्यावरील बॅरीगेट्‌स खड्ड्याच्या दिशेने कोलमडू लागल्याचे कामगारांच्या लक्षात आले. यानंतर रस्ता खचत असल्याचे दिसताच कामगारांनी बॅरीगेट्‌स बाजूला काढून दोन्ही बाजुची वाहतूक थांबवली. कामगारांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. कोथरुड परिसरात जाणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर दोन्ही बाजुला लावण्यात आलेल्या बॅरीगेट्‌सच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना तैनात करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)