रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारची धडक

कात्रज – कात्रज चौकात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव असलेल्या कारने धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. शिवशंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धावपळ करून महिलेस भारती हॉस्पिटलात दाखल केले असून महिलेवर उपचार सुरु आहेत.

शैलजा कल्याणकर (वय 45, रा. आकुर्डी), असे या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. कात्रज चौकातून रस्ता ओलांडत असतांना कात्रज चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या (एम एच 12 एन एक्‍स 7595) या गाडीने या महिलेस धडक दिली. यात ही महिला गंभीर जखमी झाली. हे बघून या ठिकाणी हजार असलेल्या शिवशंभू प्रतिष्ठानच्या दीपक सोनावणे, राहुल खोपडे, संतोष टोमके, रुपेश सोनावणे, संदीप या महिलेस जखमी अवस्थेत भारती हॉस्पिटलात दाखल केले. या महिलेची प्रकृती अजूनही गंभीर आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी तात्काळ महिलेच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. शिवशंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. माणुसकीची भावना मनात ठेवून कार्य करणाऱ्या या प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)