रस्ता ओलंडतांना महिलेचा अपघात

नगर – नगर मनमाड रस्त्यावरील गरवारे चौकात रस्ता ओलांडत असतांना एका महिलेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.या घटनेची अधिक कि फिर्यादी सुमन रामभाऊ काकडे ( रा.ढोरजा ,ता.श्रीगोंदा ,जि.अ.नगर) या दि.28 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान राहुरी येथुन एमआयडीसी येथील गरवारे चौकातील पेट्रोल पंपा समोर उतरून रस्ता ओलांडत असतांना चेतना कॉलनी कडे जात असतांना नगर कडून राहुरी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी ने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी विखे हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. यावेळी उपचारा दरम्यान दिलेल्या जबाबा वरून एम.एच.17 ए.एस.3932 या दुचाकीवरील चालक किरण गोरक्षनाथ मोरे (रा.वांबोरी ,ता.राहुरी,जि.अ.नगर ) याच्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल लाळगे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)