रस्तालूट करणारी टोळी जेरबंद

नगर – रस्तालूट करणाऱ्या टोळीस अरणगाव परिसरात दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, गुप्त बातमीदारामार्फत मागील गुन्ह्यातील 14 लाख 18 हजार रूपये ऍल्युमिनियम पट्टया, मोबाइल, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशा चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हीच टोळीतील संशयित आरोपी हा बाबुुर्डी घुमट गावात येणार असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी बाबुर्डी घुमट येथे सापळा लावून संशयितरीत्या फिरणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले. आरोपीची कसून चौकशी केली असता, सचिन मुरलीधर भगत असे नाव सांगितले. या कारवाईत पोसई राजकुमार हिंगोले, श्रीधर गुट्टे, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, योगेश गोसावी, दत्तात्रय जपे, विजय वेठेकर, विजय ठोंबरे, संदीप घोडके, मलिकार्जुन बनकर, संदीप पवार, रोहित मिसाळ, रवी सोनटक्‍के, दीपक शिंदे, संभाजी कोतकर आदींचा सहभाग आहे.

आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली देऊन त्याचे साथीदार महेश भानुदास थोर (रा. बाबुर्डी घुमट) भहिरू लक्ष्मण मोरे यांना अरणगाव परिसर येथून ताब्यात घेऊन या प्रकरणाबाबत त्या दोघांची चौकशी केली असता, गुन्हा इतर साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची 5 लाख रुपये किंमतीची व मारूती झेन 1 लाख रुपये किंमतीची गाडी तसेच गुन्ह्यातील अल्युमिनियमच्या अंदाजे 10 लाख रुपये किंमतीच्या पट्टया, असा एकूण 16 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील इतर आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्‍यता पोलीस वर्तुळातून व्यक्‍त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)