कोरडगावात अतिक्रमणात वाढ, जा-ये करणारांचे हाल

कोरडगाव – पाथर्डी तालुक्‍यातील कोरडगाव-बोधेगाव या वर्दळीच्या मार्गावर दुतर्फा हॉटेल, टपरीचालकांचे अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुकानांमध्ये जाण्यासाठी रस्त्यावर बेशिस्तपणे दुचाकी, चारचाकी वाहने लावण्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे संबंधीत विभागाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी कोरडगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

कोरडगाव-बोधेगाव हा या भागातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. रस्त्यावरून या भागातील नागरिकांची ये-जा सुरू असते. तसेच वाहतुकीचीही वर्दळ असते. रस्त्यावर परिसरातील दुचाकीस्वार, रिक्षा, चारचाकी वाहने बेशिस्तपणे रस्त्यावरच उभी केलेली असतात. यामुळे दोन्ही बाजूने जवळपास अर्ध्याहून अधिक रस्त्यावर अतिक्रमण होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, टपरीचालकांनी अतिक्रमणे केली आहेत. तसेच इतरही छोट्या-मोठ्या व्यावसायीकांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे.

येथील अतिक्रमणधारकाना यापूर्वी प्रशासनाने दोनवेळा नोटीसा दिल्या आहेत. तरीही एकाही अतिक्रमणधारकाने अतिक्रमण काढलेले नाही. तरीही कोणाकडूनही काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे या अतिक्रमणधारकांचे फावत असल्याचे दिसून येते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. संबंधीत विभागाने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)