रसिला खूनप्रकरणी जामीन फेटाळला

पिंपरी – हिंजवडी येथील इन्फोसिकंपनीतील कर्मचारी रसिला ओपी हिचा सुरक्षा रक्षकानेच गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.

सत्र न्यायाधीश व्ही. ए. रोटे यांनी ही सुनावणी केली. गैरवर्तनाबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याची तंबी दिल्यामुळे सुरक्षा रक्षक भावेन भराली सैकिया (वय-27, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. तातीबहार, जि. लखीमपूर, आसाम) याने रसिलाचा वायरने गळा आवळून खून केला होता. ही घटना 29 जानेवारी 2017 रोजी घडली होती.

खून करून पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे मुंबईतून अटक केली होती. या हत्याकांडाने संपूर्ण आयटी सेक्‍टर हादरले होते. त्याने जामिनासाठी ऍड. बी. ए. आलुर यांच्यामार्फत अर्ज केला होता. ऍड. तोसीफ शेख यांनी युक्तीवाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)