रसायनमुक्‍त धान्यपिके ही काळची गरज – पोपरे

पुणे – रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या धान्याच्या उत्पदनाबरोबरच आजारही वाढत आहेत. आता रसायनांशिवाय भाज्या आणि धान्य मिळणे शक्‍य नाही. पण, गेल्या अनेक वर्षे मी धान्यांचे वाण साठवत आहे. माझ्या 150 पेक्षा जास्त प्रकारांची धान्य-पिकांचे वाणं आहेत. अनेक वर्षे मी माझ्या शेतामध्ये याच वापर करून उत्पादन घेत आहे. आपण हे वाण साठवले नाही, तर पुढच्या पिढीला याचा वारसा मिळणार नाही, असे आदिवासी भागांमध्ये “सीड बॅंक’ चालविणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी सांगितले.

13 व्या किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत राहीबाई पोपरे बोलत होत्या. यावेळी महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सुप्रिया चित्राव आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“निसर्ग आणि वन्यजीव संपत्ती सर्वांपर्यंत नेण्यासाठी माहितीपट हे प्रभावी माध्यम आहे. माझ्यासारख्या निसर्गप्रेमीला हे व्यासपीठ मिळाल्याने मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचू शकलो. अनेक शासकीय अधिकारी आणि जबाबदार व्यक्ती वेळेअभावी चित्रपट पाहू शकत नव्हत्या पण जेव्हा आपण दहा मिनिटांचा माहितीपट त्यांच्यासमोर नेतो तेव्हा त्या व्यक्ती समस्येच्या मुळापर्यंत पोहोचू शकतात. अनेक निर्णय सुद्धा यामुळे बदलले गेल्याचे मी पाहिले आहे अणि निसर्गप्रेमी म्हणून मला याचे समाधान वाटते,’ असे मत दिग्दर्शक शेखर दत्तात्री यांनी व्यक्त केले.

“कमी वेळात माहितीपट बनवायचा आणि बक्कळ पैसे कमवायचे असे मी कधीच केले नाही. कोणताही चित्रपट तयार करण्यासाठी सविस्तर कथा आणि संशोधन महत्त्वाचे असते. त्यांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड करणे मला पटत नाही. वन्यजीव संपत्ती आणि निसर्ग हेच विषय माझ्या चित्रपटांमध्ये प्राधान्याने राहिले. पर्यावरणा संबंधित चित्रपटांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही. आपल्याकडे चर्चा होते पण प्रत्यक्षामध्ये तितके काम होताना दिसत नाही,’ अशा भावना ज्येष्ठ दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थु यांनी व्यक्‍त केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)