रशियासोबत “एस-400′ खरेदी करार !, भारताने अमेरिकेचा दबाव झुगारला

 अवकाश सहकार्य करारावरही स्वाक्षऱ्या ; भारत रशियात मॉनिटरींग स्टेशन उभारणार

नवी दिल्ली: भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस येथे आज एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियासोबत “एस-400′ एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

दोन्ही देशांमध्ये अवकाश सहकार्य करारावर सुद्धा स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. रशियात सायबेरीया जवळच्या नोवोसिबिर्स्क शहरात भारत आपले मॉनिटरींग स्टेशन उभारणार आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि अवकाश सहकार्य यासंबंधीच्या महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होईल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता.

यात एस-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमचा सर्वात महत्वाचा करार होता. या करारातंर्गत भारत 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजून एस-400 प्रणाली रशियाकडून विकत घेणार आहे. भारताने रशियाकडून हे क्षेपणास्र खरेदी केल्यास निर्बंध घालण्यात येतील, असा इशारा अमेरिकेने यापूर्वीच दिलेला आहे.

दरम्यान, या वर्षातील मोदी आणि पुतिन यांच्यातील ही तिसरी बैठक आहे. मे महिन्यात रशियात सोची आणि त्यानंतर जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्‍स परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष

भारत दरवर्षी जपान आणि रशिया या दोनच देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतो. अमेरिकेने सीएएटीएसए कायदा बनवला आहे. अमेरिका सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी झाली आहे. अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले. कारण चीनने रशियाकडून एसयू-35 फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-400 मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे. त्यामुळे आता अमेरिका काय भूमिका घेते याकडे भारतचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)