रशियासाठी ट्रम्प यांचे काम होते का? : एफबीआयकडून तपास सुरु

वॉशिंग्टन- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियासाठी काम करत होते का, याची चौकशी एफबीआयने सुरू केली होती, असा दावा अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केला आहे. एफबीआयचे संचालक जेम्स कोमी यांना पदावरून काढल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ट्रम्प हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका आहेत का, हे या चौकशीतून गुप्तचर खात्याकडून पडताळून पाहण्यात आले. तसेच ट्रम्प हे मुद्दाम रशियासाठी कार्यरत होते किंवा नकळतपणे रशियाकडून प्रभावित झाले होते, हेही या चौकशीत तपासण्यात आले. ट्रम्प यांच्या रशियाशी संबंधांबाबत एफबीआयच्या काही उच्च अधिकाऱ्यांना 2016 च्या अध्यक्षपदाच्या प्रचार मोहिमेदरम्यानच संशय आला होता. मात्र एवढ्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण प्रकरणाची चौकशी कशी करावी याबद्दल ते गोंधळलेले असल्यामुळे त्यांनी चौकशी सुरू केली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ट्रम्प यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. एफबीआयच्या नेतृत्वाने कोणत्याही कारणाशिवाय किंवा पुराव्याशिवाय माझ्या विरोधात तपास सुरू केला होता, असे बातम्यांवरून दिसते असे ट्‌वीट त्यांनी शनिवारी सकाळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)