रशियावरही कारवाई करण्याची डेमोक्रॅटिक सदस्यांची मागणी

वॉशिंग्टन – अमेरिकेतील रिपब्लीकन पक्षाच्या संसद सदस्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर केलेल्या हल्ल्याचे समर्थन आणि स्वागत केले आहे. पण डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी मात्र या कारवाईचे स्वागत करताना अमेरिकने रशियावरही हल्ला करून त्यांना धडा शिकवला पाहिजे असे म्हटले आहे. सीरियातील अत्याचारी असद यांच्या राजवटीला रशियाचा पाठिंबा आहे त्यामुळेच ते रासायिन हल्ल्यांसारखे धाडस करू शकतात त्यामुळे रशियावरही अमेरिकने हल्ला करून त्यांना धडा शिकवला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे ज्येष्ठ संसद सदस्य जॉन मॅकेन यांनी म्हटले आहे की अमेरिकेने केलेली ही कारवाई पुर्ण समर्थनीय असून सीरियाने यापुढे रासायनिक क्षेपणास्त्राचा वापर केल्यास त्यांना अशाच कारवाईला सामोरे जाऊ शकते त्यामुळे त्यातून ते धडा शिकतील आणि ही समस्या संपेल असा आम्हाला विश्‍वास वाटतो. ते म्हणाले की रासायनिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याने त्यातून होणाऱ्या लाभापेक्षा त्याची हानी अपरिमीत आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. असद यांना वाचवण्यासाठी इराण आणि रशियाने चालवलेले प्रयत्न अपयशी ठरतील असा दावाही त्यांनी केला.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले आहे की केवळ एका रात्रीत सीरियावर हल्ला करून हा प्रश्‍न सुटणार नाहीं तर अध्यक्ष ट्रम्प यांनी या संबंधात सीरियावर व्यापक कारवाई केली पाहिजे. एवढेच नव्हे तर सीरियाचे अध्यक्ष असद यांना पाठिशी घालणाऱ्या रशियालाही अमेरिकेने धडा शिकवला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)