रशियाच्या 60 हेरांची अमेरिकेतून हकालपट्टी

वॉशिंग्टन – अमेरिकेने आज रशियाच्या 60 अधिकाऱ्यांची देशातून हकालपट्टी केली. हे सर्वजण रशियाचे गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच सिएटल येथील रशियाचा दूतावासही बंद करण्यात आला आहे. हकालपट्टी करण्यात आलेले डझनवारी जण हे संयुक्‍त राष्ट्रातील रशियाचे कायम दूतावासातील आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हेरांची अमेरिकेतून हकालपट्‌ती केली असून सिएटल येथील रशियन दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहे. या हेरांनी अमेरिकेच्या पाणबुडी आणि बोईंगच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई केली आहे, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सॅन्डर्स यांनी सांगितले. रशियाच्या या हेरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अमेरिका सोडून जाण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

इंग्लंडमधील हेरगिरी प्रकरणातील रशियाचा माजी गुप्तहेर सर्जी स्क्रिपालविरोधात “नर्व्ह एजंट’चा वापर करण्याचा इशाराही व्हाईट हाऊसने दिला आहे. या हेराच्या माध्यमातून ब्रिटनमध्ये हल्ला करण्याचा रशियाचा डाव असल्याचा आरोप रशियाने फेटाळला आहे. ब्रिटनने यापूर्वीच रशियाच्या 23 अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याचा दावा रशियाने फेटाळला आहे.

अमेरिकेमध्ये रशियाचे 100 गुप्तहेर आहेत. त्यांच्यापैकी काहींना हाकलण्याचे पहिले पाऊल अमेरिकेने उचलले आहे, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र आणखीही गुप्तहेरांची हकालपट्टी अमेरिकेकडून केली जाऊ शकते, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)