नवी दिल्ली: रशियाकडून 40 हजार कोटी रुपयांच्या “एस-400 ट्रिम्फ’ क्षेपणास्त्रांच्या खरेदीबाबत अमेरिकेकडून होणाऱ्या आक्षेपाला “2+2′ या चर्चेदरम्यान उत्तर दिले जाईल. रशियाबरोबरच्या संरक्षण व्यवहारांबाबत अमेरिकेकडून निर्बंध असले तरी हा व्यवहार केला जाईल, असे सरकारी सूत्रांनी रविवारी सांगितले.

रशियाबरोबर होणाऱ्या संरक्षण सामुग्रीच्या खरेदी व्यवहाराबाबत अमेरिकेच्या निर्बंधांमधून भारताला सवलत दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. भारताला प्रादेशिक संरक्षण सिद्धतेसाठी या क्षेपणास्त्रांची आवश्‍यकता आहे. रशियाबरोबरचे असलेल्या घनिष्ठ संबंधांचा विचार करून ही सवलत मिळणे अपेक्षित आहे. या क्षेपणास्त्र खरेदीची प्रक्रिया भारताने जवळपास पूर्ण केली आहे. त्यामुळे ही खरेदी होईल. या संदर्भातील भारताची भूमिका अमेरिकेला कळवण्यात येईल, असे उच्चस्तरिय अधिकारी सूत्रांनी सांगितले.

भारताने रशियाबरोबर हा व्यवहार करू नये, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या सुधारीत संरक्षण कायद्यानुसार निर्बंधांमधून एखाद्या देशाला वगळण्याचा अधिकार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या “2+2′ चर्चेला 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. यादरम्यान द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांसंदर्भात सामोपचाराने चर्चा होणार आहे. विदेश मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण संत्री निर्मला सितारामन या अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ आणि संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)