रवी शास्त्रींना प्रशिक्षक हदासाठी वर्षाकाठी 7 कोटींची ऑफर

नवी दिल्ली – बीसीसीआयने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वर्षाकाठी 7 कोटींहून अधिक पॅकेजची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शास्त्रींना जास्तीत जास्त साडेसात कोटींपर्यंत मानधन देण्यात येईल, असा खुलासा देखील बीसीसीआयच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना केला आहे. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदासाठी इतक्‍याच मानधनाची मागणी केली होती. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने शास्त्रींना वर्षाला 7 कोटी रूपयांचे पॅकेज देण्याचे ठरवल्याची माहिती मिळाली आहे.

शास्त्रींसोबत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी नियुक्त केलेल्या प्रशिक्षकांनाही वार्षिक मानधन 2 कोटींपर्यंत देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. या संदर्भातील करारांवर बीसीसीआय शिक्कामोर्तब करणार आहे.

बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील. कोचपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांना माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कडवे आव्हान दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)