रवी वेंकटेश युनिसेफवर 

नवी दिल्ली: युनिसेफने रवी वेंकटेश यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. यूएन मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वेंकटेश युनिसेफला उच्चस्तरीय भागिदारी व संशोधनासाठी जागतिक पातळीवर मदत देतील. त्याचप्रमाणे ते युनिसेफला जागतिक कंपन्यांबरोबर मूल्यवर्धित भागिदारी शेअर करण्यासाठी मदत करतील.
2015-18 दरम्यान वेंकटेश बॅंक ऑफ बरोडाचे माजी अध्यक्ष होते. त्यापूर्वी मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष असताना त्यांनी भारतामध्ये मायक्रोसॉफ्टचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विस्तार केला होता. त्यांनी कमिन्स इंडियाचे अध्यक्षपद आणि इन्फोसिसचे सह- अध्यक्षपदही भूषवल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)