रवीनाची मुलगी बनली बॉक्‍सर

रवीना टंडनने आपल्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ अपलोड करतानाच तिने सर्वांना आपल्या मुलीपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे. रवीनाची 13 वर्षांची मुलगी राशा बॉक्‍सिंग शिकत असताना या व्हिडीओमध्ये दिसते आहे. तिच्या ट्रेनरबरोबर ती प्रॅक्‍टिस करताना बघायला मिळते आहे. राशाचे पंच इतके जबरदस्त बसत आहेत, की तिचा ट्रेनरही थोडा मागे सरकलेला दिसतो आहे.

एका पंचच्या वेळी त्याच्या तोंडून अचानक “ओह’ असे कौतुकास्पद उद्‌गारही निघाले आहेत. त्यावर राशा त्या ट्रेनरला सॉरी देखील म्हणते. ही बॉक्‍सिंग स्कील बघून रवीना मात्र खूप खूष झालेली दिसते आहे. तिने आपल्या मुलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. “माझ्या बेबीबरोबर कोणीही पंगा घेऊ नका. माझी छोटी मेरी कोम’ अशा शब्दात तिने आपल्या लेकीचे कौतुक केले आहे. रवीना टंडनला एकूण चार अपत्ये आहेत. तिने 1995 मध्ये पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले. 2003 मध्ये रवीनाचे लग्न अनिल धडानीबरोबर झाले आणि 2003 मध्ये राशाचा जन्म झाला. त्यानंतर रवीनाला एक मुलगाही झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)