रवींद्र जडेजाने स्वत:ला सिद्ध केले 

सुमारे वर्षभरापेक्षा अधिक काळ वन डे क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर रवींद्र जडेजाने आशिया चषक स्पर्धेतून जोरदार पुनरागमन केले. या स्पर्धेतून जडेजाने स्वत:ला सिद्ध केले आहे, असे प्रशंसोद्‌गार रोहित शर्माने काढले. पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यांत जडेजाने बांगला देशविरुद्ध 29 धावांत 4 बळी घेतले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुमच्या मनात ती आग नसेल, तर तुम्ही जडेजासारखे कम बॅक करूच शकणार नाही, असे सांगून रोहित म्हणाला की, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही प्रकारांमध्ये जडेजाने आपला दर्जा दाखवून दिला आहे. अंतिम सामन्यात जडेजाने मोहम्मद मिथुनला अफलातून फेकीवर धावबाद केले. तो सामन्याचा टर्निंग पॉइंट होता, असेही रोहितने सांगितले.

 

सुमारे 15 महिन्यांनंतर पुनरागमनाची संधी साधण्यासाठी आणि इतर कोणाहीपेक्षा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपण कमालीचे उत्सुक होतो, असे सांगून जडेजा म्हणाला की, भारतीय संघासाठी खेळण्याइतकी माझ्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)