रवींद्र जडेजाचे पुनरागमन अपेक्षित

सुमारे सव्वा वर्षापासून एकदिवसीय आणि टी-20 संघातून बाहेर राहिल्यानंतर अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पुनरागमनात केलेली कामगिरी पाहता या वेळी त्याचे “कम बॅक’ अपेक्षित आहे. भारतीय संघाला जडेजासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रचंड अनुभव असलेल्या खेळाडूची गरज आहे.

 

आणीबाणीच्या वेळी तो निर्णायक भूमिका बजावू शकतो. त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी प्रतिस्पर्धी फलंदाजांना वेसण घालणारी असून त्याचे अफलातून क्षेत्ररक्षण हा तर बोनसच ठरतो. पुढच्या वर्षीच्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी संघबांधणीला आणि नियोजनाला खऱ्या अर्थाने सुरुवात करायची झाल्यास त्यातून जडेजाला वगळणे अवघड जाणार आहे.

 

कसोटी मालिकेतून अत्यावश्‍यक अशी विश्रांती मिळालेल्या भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा संघात समावेश ही औपचारिकताच ठरावी. परंतु जडेजाच्या समावेशामुळे दुसरा कोणता फिरकी गोलंदाज संघाच्या रचनेत अचूक बसू शकेल, याबाबत संभ्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)