रवि पुजारी टोळीतील गुन्हेगारास पिस्तूलासह अटक

रवि पुजारी टोळीतील सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तूलासह अटक
पुणे,दि.19(प्रतिनिधी)- रवि पुजारी टोळीतील मोक्‍याच्या गुन्हयात जामीनावर सुटलेला सराईत गुंड निलेश भरम(30,रा.आंबेगाव पठार) याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, सात राउंड व एक मारुती स्विफ्ट कार असा 5 लाख 41 हजार 400 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
निलेश भरम याच्यावर सहाकारनगर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्‍ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरम याच्यावर भारती विद्यापीठ , कोंढवा, सहकारनगर, स्वारगेट व खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, दरोडा, दराड्याची तयारी अशा गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो मोक्‍याच्या गुन्हयातून जामिनावर सुटलेला आहे. तो रवि पुजारी गॅंगशी संबंधीत असल्याने त्याने शस्त्र का खरेदी केले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. तो के.के.मार्गेट पंपामागे एका गॅरेजजवळ येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस फौजदार संजय दळवी, विनायक पवार, राहुल घाडगे, महेश कदम, परवेज जमादार, अजय थोरात, रामदास गोणते, शैलेश सुर्वे यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)