रविशंकर यांचे शबरीमलाच्या भाविकांना शांततेचे आवाहन

बंगळुरू: आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी शबरीमलाच्या भाविकांना शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे, त्याचा निकाल येण्याच वाट पहा असे आवाहन त्यांनी भक्तांना केले आहे.

या मंदिराची प्राचीन परंपरा कायम राखली जावी अशी आपलीही भूमिका असल्याचे त्यांनी एका निवेदनात नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यात बाधा येईल आणि समाजात अशांतता पसरेल असे कृत्य कोणीही करू नये. त्यांनी म्हटले आहे की केरळाने महिलांचे अभिमान आणि त्यांचे अधिकार कायम राखण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही, त्याचवेळी मंदिराची परंपरा आणि भाविकांचा भावना जपण्याचीही आवश्‍यकता त्यांनी व्यक्त केली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)