रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली – देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबीत खटल्यांची संख्या वाढत असून न्यायाधिशांची रिक्त जागाही भरल्या जात नाहीत त्याकडे लक्ष देण्याचे सोडून या खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद हे खोट्या बातम्या पसरवण्यास मश्‍गुल आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर प्रसाद यांनी आज पीटीआयशी बोलताना पलटवार केला. ते म्हणाले की न्याय व्यवस्थेला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे आम्ही त्यावर राजकारण करणार नाहीं असे ते म्हणाले.

ते म्हणाले की सन 2016 मध्ये एकाच वर्षात आम्ही उच्च न्यायालयात 126 न्यायाधिश नियुक्त केले होते. स्वातंत्र्यानंतर भारतात एकाच वर्षात इतके न्यायाधिश नियुक्त करण्याचा हा पहिलाच प्रकार होता असेही त्यांनी यावेळी नमूद केले. केम्ब्रीज ऍनालॅटिका प्रकरणात कॉंग्रेसवर झालेल्या आरोपांच्या नैराश्‍यातूनच राहुल गांधी यांनी न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाई बाबत ट्‌विटर संदेश प्रसारीत केला असावा असा दावाही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)