रविवार पेठेतील सराफ दुकानावर दरोडा टाकणारे सहा नेपाळी जेरबंद

पुणे- रविवार पेठेतील सराफ दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सहा जणांना फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले. सर्वजण नेपाळ येथील रहिवाशी आहेत. दरम्यान त्या सहा जणांना 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी.मेश्राम यांनी दिला आहे.
मनिष गोविंद स्वार (वय 25, रा. नाना पेठ), देवेंद्र बहादुर कुवर (वय 27, रा. कोंढवा), प्रकाश करण खडका (वय 27, रा. नाना पेठ), मनोज मंगल बोगाटी (वय 21, रा. मुंबई), गोकुळ सागर ओड (वय 20, रा. गंजपेठ) आणि हंसराज लाले कामी (वय 23, रा. शुक्रवार पेठ) अशी पोलीस कोठडी झालेल्या सहा जणांची नावे आहेत. भरत रनी बिके हा या प्रकरणात फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रविवार पेठ येथील लोणर आळी येथील एका सराफ दुकानावर 10 फेब्रुवारे रोजी रात्री 9.30 च्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्यामध्ये 36 हजार 960 रुपयांचे सोन्याचे मनी, 77 हजार रुपयांचे ब्रेसलेट, 6 हजार 120 रुपयांचे 20 अष्टपैलू मनी, 7 हजार 900 रुपयांचे चांदीचे पायातील तोडे, 49 हजार रुपये रोख, नोकीया कंपनीचा हॅंडसेट, ज्यामध्ये आयडीया कंपनीचे सीमकार्ड असा ऐवज लांबविण्यात आला होता. या प्रकरणी सहा जणांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी सर्वजण सराईत आहेत. रोख रक्कम वगळता गुन्ह्यातील सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे. रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी, फरार बिके या साथीदाराच्या शोधासाठी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस.ए.क्षीरसागर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सहा जणांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)