रविवार ठरला “टोल फ्री’चा

कापूरहोळ- पुणे-सातारा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रुंदीकरणाचे अनेक वर्षांपासून सुरू असलेले काम काही ठिकाणी ठप्प तर काही ठिकाणी संतगतीने सुरू आहे. तसेच काही ठिकाणी राडारोडा पडल्यामुळे छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यातच टोल वसूल जोरदार सुरू असल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज (रविवारी) खेडशिवापूर टोलनाक्‍यावर टोल बंद आंदोलन करून सर्व वाहने टोल फ्री सोडण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्‍त केले. दरम्यान, शिवसेने टोल नाक्‍यावर विविध घोषणा देत रिलान्स इंफ्रा व महामार्ग प्राधिकरणाचा निषेध नोंदविला.
पुणे-सातारा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. याला कारण नादुरुस्त रस्ते, कामाचा सुमार दर्जा, रस्त्याच्याकडेने दिशादर्शक फलकाचा अभाव, सेवा रस्त्यांची अपुरी कामे यामुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यातच भरीस भर म्हणजे भोर, वेल्हे, मुळशी तालुक्‍यांसह खडकवासला परिसरातील नागरिकांसह प्रवासी वाहनांकडूपन सक्‍तीने टोल वसुली केली जात आहेत. मात्र, त्या मानाने अत्यावश्‍यक सुविधांचा अभाव असून याकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करून सर्रासपणे सक्‍तीने टोल वसुली करीत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी खेडशिवापूर टोल नाक्‍यावर भोर तालुका शिवसेनेच्या वतीने दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच दिवसभर वाहने “टोल फ्री’ सोडून देण्यात आल्या. तर दिवसभर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी कुलदीप कोंडे, माऊली शिंदे, नितीन वाघ ,निशा सपकाळ यांची भाषणे झाली.तर अविनाश बलकवडे, अमोल पांगारे, संतोष भिलारे, केदार देशपांडे, युवराज जेधे, आदित्य बोरगे, गणेश धुमाळ, विकास चव्हाण, विनायक कोळपे, गणेश गोळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

  • तोपर्यंत ठिय्या आंदोलन
    प्रवाशांच्या न्याय मागण्यांसाठी शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शांततेत करण्यात आले. रोज हजारो प्रवासी व वाहनचालक या टोलनाक्‍यावरून जात असतात मात्र, त्यांच्यासाठी कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. या ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. यामुळे महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. याला कारणीभूत रिलायन्स इंफ्रा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहेत. जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाहीत व दुरुस्तीची हमी देत नाहीत, तोपर्यंत टोल नाक्‍यावर ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)