रविवारी शॉपिया चकमकीत 6 दहशतवादी ठार-एक जवान शहीद 

संग्रहित छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर): जम्मू-काश्‍मीरच्या शॉपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांना आज मोठे यश मिळाले आहे. आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका घरात लपून बसलेल्या सहा दहशतवाद्यांचा खातमा केला, या सहा जणात हिजबुल मुजाहिदीनचे चार आणि लष्करे तैय्यबाचे दोन दहशतवादी आहेत. 12 लाखांचे इनाम असलेले डबल ए श्रेणीतील उमर माजिद गनई उर्फ गजाला उर्फ हंजुला पुत्र मजीद हनाई आणि मुश्‍ताक महंमद पीर उर्फ हामीद, दहा लाखांचे इनाम असलेले ए श्रेणीतील वसीम अहमद वागे आणि अब्बास बट हे दोघे आणि तीन लाखांचे इनाम असलेला सी श्रेणीतील खालिद फारूख मलिक उर्फ अबू तल्हा यांचा सहा जणात समावेश आहे.

शोपिया येथे सहा दहशतवाद्यांचा खातमा करून परतणाऱ्या जवानांवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या 48 तासांमध्ये सुरक्षा दलांनी दक्षिण काश्‍मीरमध्ये 12 दहशतवादी टिपले आहेत. शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर रविवारी शॉपिया येथेही सहा दहशतवादी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. दहशतवाद्यांची ओळ्ख पटली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. शॉपिया चकमकीनंतर परतणाऱ्या सुरक्षा दलांच्या जवानांच्या वाहनांवर स्थानिक लोकांनी जोरदार दगडफेक केली. दहशतवादी मारले गेल्याने ते शोकसंतप्त झाले होते. 

मात्र या चकमकीत लष्कराच्या 34 आरआर चा एक जवान शहीद झाला आहे. नाजीर अहमद असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. आणखी एक जवान जखमी झाला आहे. या चकमकीत काही स्थानिक नागरिक जखमी झाले असल्याची माहिती शॉपियाचे एसएसपी संदीप चौधरी यांनी सांगितले.

-Ads-

एका घरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच लष्कराच्या 34 आरआर, सीआरपीएफ आणि सीएसी ने बतागुंड येथे घेराबंदी केली. दहशतवाद्यांनीच गोळीबाराला सुरुवात केल्यानंतरव्‌ सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत सर्व दहशतवाद्यांना टिपले. त्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)