रविंद्र माने ग्रामभूषण पुरस्काराने सन्मानित

कराड – अतित येथील कै. माधवराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने माजी सरपंच माधवराव मारुती जाधव ( दादा) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ग्रामभूषण पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. मान्याचीवाडीचे सरपंच रविंद्र माने यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सदगुरु निळकंठ शिवाचार्य (धारेश्वर महाराज), इंदोर, मध्यप्रदेशचे सद्गुरु सुरेंद्र शुक्‍ला उपस्थित होते.

डॉ. शिंदे म्हणाले, ग्रामविकासामध्ये सरपंचाची भूमिका महत्त्वाची आहे. शासन तर आपल्या पाठीशी आहेच. परंतु शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागातून गावात विकासकामे करता येतात हे मान्याचीवाडी गावाने दाखवून दिले आहे. ग्रामसभेसाठी बायोमेट्रिक प्रणाली राबवणारे एकमेव गाव म्हणून मान्याचीवाडी गाव आहे.

धारेश्वर महाराज म्हणाले, आपण सर्व धर्माचा चिकित्सक अभ्यास केला पाहिजे. जातीय सलोखा राखायला हवा. प्रथम देशहित महत्वाचे याची जाणीव असु द्या. मान्याचीवाडी गावाने आपणा सर्वांना आदर्श घालून दिला आहे. जेथे महिलांचा सहभाग मोठा असतो तेथे यश हमखास असते. म्हणून आपण महिलांचा गौरव करूया. स्त्री-भ्रुण हत्त्या होणार नाही यासाठी दक्ष राहुया. प्रास्ताविक तात्यासाहेब यादव चंद्रकांत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन धरपडे यांनी तर आभार अशोक जाधव यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)