रयत संस्थेच्या इमारत बांधकामासाठी 25 लाख

मंचर- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील रयत संस्थेच्या इमारत बांधकामासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी पहिला हप्ता 12 लाख 50 हजार रुपयांच्या मंजुरीचे पत्र ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आले
पिंपळगाव (खडकी) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम रयत शिक्षण संस्था सेवक निधी आणि पिंपळगाव (खडकी) ग्रामस्थ यांच्या लोकवर्गणीतून प्रगतीपथावर आहे. त्यानुसार पिंपळगाव (खडकी) येथील ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी लांडेवाडी येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन शाळेच्या नूतन इमारत बांधकामासाठी 20 लाख रुपये निधीची मागणी केली होती. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामस्थांची मागणी तात्काळ मान्य करून इमारतीच्या बांधकामासाठी खासदार आढळराव पाटील यांनी खासदार निधीतून 25 लक्ष रुपये निधी देणार असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात 12.50 लाख रुपये निधी तात्काळ मंजूर करून मंजुरीचे पत्र ग्रामस्थांना सुपुर्द केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक सचिन बांगर, युवासेना आंबेगाव तालुका युवा अधिकारी प्रवीण थोरात पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव राक्षे, शिवसेना उपतालुकाप्रमुख सोपान पोखरकर, रामदास बांगर, अनिल पोखरकर पाटील, विकास बांगर, शिवसेना विभागप्रमुख दीपक पोखरकर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, शाखाप्रमुख भगवान बांगर, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश बांगर, युवानेते राहुल पोखरकर, गणेश बांगर, योगेश बांगर, राहुल बांगर, मुख्याध्यापक बी. व्ही.जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)