रयतच्या कार्यक्रमात ना. जावडेकरांकडे हक्काचेच मागणार

डॉ.अनिल पाटील: गुरूवारी शताब्दी महोत्सव
सातारा- रयत शिक्षण संस्थेचे हक्काचे जे प्रलंबित प्रश्‍न आहेत तेवढेच केंद्रिय मुनष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणार असल्याचे संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले. साताऱ्यातील संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ गुरूवार दि.4 ऑक्‍टोंबर रोजी होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ना.प्रकाश जावडेकर हे येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी शताब्दी कार्यक्रमात आम्ही जावडेकरांकडे काही मागणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

-Ads-

त्यावर डॉ.अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे हक्काचे काही प्रश्‍न प्रलंबित आहेत ती सोडवणूक करण्याची मागणी आम्ही करणार असल्याचे सांगितले. तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली तेव्हा संस्थेचा अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असावेत, अशी संस्थेच्या घटनेत तरतूद केली असल्याचे खा.उदयनराजे यांनी सांगितले आहे. त्यावर डॉ.पाटील यांनी तशा प्रकारची घटनेत कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)