रमेश बागवे यांचे आरोप पुत्रप्रेमापोटी

भाजप शहराध्यक्षांचे बागवे यांच्या आरोपाला उत्तर

पुणे – कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी भाजपवर केलेले आरोप हे पुत्रप्रेमापोटी असून, कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालणारे आहे, असे उत्तर भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश मंडळाच्या मिरवणुकीवरून वाद झाल्याने कॉंग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांना खडक पोलिसांनी अटक केली होती. ही अटक सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आणि सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांचेच हे षडयंत्र असल्याचा आरोपही बागवे यांनी केला होता. कॉंग्रेसला संपवण्यासाठीच भाजप ही खेळी करत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या आरोपांना गोगावले यांनी उत्तर दिले आहे.

बापट आणि कांबळे यांच्यावर बागवे यांनी केलेले आरोप हे राजकीय असून, अविनाश बागवे आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या गंभीर गुन्ह्यांवर पांघरूण घालून दिशाभूल करणारे आहेत, अशी टीका गोगावले यांनी केली आहे. बागवे यांचे आरोप पुत्रप्रेमापोटी असून ते निराधार आहेत. पोलिसांनी त्यांच्या अधिकारात नि:पक्षपणे कारवाई केली असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे नेते करत आहेत, असेही गोगावले यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)