कमला मिल्स दुर्घटना प्रकरण : प्रत्येकी 2 लाखाचा जामीन मंजूर
मुंबई – लोअर परळच्या कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील अटकेत असलेले प्रमुख आरोपी आणि कमला मिल कम्पाउंडच्या मालकांपैकी एक रमेश गोवानी आणि कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्‍टर रवी भंडारी यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती व्ही. एल. अचलीया यांनी रोख दोन लाख रुपयाचा सर्शत जामीन मंजूर केला. तसेच 50 हजार रुपये जाचमुचलकाचे कागदपत्रांची दोन आठवड्यात पूर्तता करावी, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

कमला मिल कंपाउंडमधील पबमध्ये 29 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या अग्नितांडवात 14 जण मृत्यमुखी, तर 55 जण जखमी झाले होते. या प्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी पब मालक तसेच जागेचे मालक रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांच्यासह 14 जणांना जानेवारीमध्ये अटक केली होती. गेली चार महिने तुरूंगात असलेल्या रमेश गोवानी आणि रवी भंडारी यांच्या वतीने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने या जामिन अर्जावर 16 मेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एल. अचलीया यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वतीने ऍड. सुदीप पासबोला यांनी युक्तीवाद केला.

उभयपक्षांच्या युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय देताना दोन्ही आरोपींना दिलासा दिला. दोघाही आरोपींना 50 हजार रुपयाचा जाचमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. मात्र या जाचमुचलक्‍याची कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी विलंब होणार असल्याने आरोपींच्या वतीने रोख रक्कमेचा जामीन देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान करून प्रत्येकी रोख रक्कम दोन लाखाचा सशर्त जामीन मंजूर करताना पासपोर्ट जमा करण्याबरोबरच न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत सोडून जाण्यास मनाई केली आहे. तसेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एन.एम जोशीमार्ग पोलीस ठाण्यात हजेरी लावावी. तपासात पोलिसांना सहकार्य करण्याबरोबरच जर बॅकांची देणी असतील तर ती दोन आठवड्यात द्यावीत आदी अटीही न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)