रमेश कदम शिवीगाळ प्रकरणाची पोलिस चौकशी होणार

मुंबई : आमदार रमेश कदम यांनी तुरूंगात पोलिसांना केलेली शिवीगाळ ही त्यांना आणखी महागात पडण्याची शक्‍यता आहे. कारण शिवीगाळ प्रकरणाची पोलिस उपायुक्त स्तरावर चौकशी होणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हे आदेश दिले आहेत.
तुरुंगात असूनही रमेश कदम यांनी जेलमध्ये पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी झोन 3 चे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे या कलमांखाली रमेश कदम यांच्यावर कारवाई करण्याची तयारी मुंबई पोलिसांनी केली आहे. पण त्याआधी नेमके काय घडले, याचा अहवाल देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात आणलं होतं. मात्र कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचे म्हणणे लिहून घेण्यास सांगितले. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)