रमाबाई आंबेडकर पुतळा परिसराची महापौरांकडून पाहणी…

पुणे – वाडिया महाविद्यालयासमोरील माता रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यानात बसवण्यात आलेल्या माता रमाबाईंच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते बुधवारी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त स्थळाची पाहणी महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी केली. पुतळ्यासंबंधी सर्व आवश्‍यक कामांची पूर्तता करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

यावेळी स्थानिक नगरसेविका लता राजगुरू, महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने गेल्या वर्षीपासूनच प्रयत्न सुरू केले होते. तसेच तसा ठरावही सर्व पक्षनेत्यांनी केला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि अन्य कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने त्यांची वेळ मागून घेण्यात आली. त्यानुसार राष्ट्रपतींनी अर्ध्यातासाचा वेळ या अनावरण कार्यक्रमासाठी दिला आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी भेट देऊन येथील राहिलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)