रमजान ईद सण शांततेत साजरा करावा

शिक्रापूर – मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे रमजान आहे. मुस्लिम नागरिकांनी सर्व धर्मांना एकत्रित घेऊन रमजान ईद सण शांततेत आणि सुव्यवस्थित साजरा करावा, असे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी शिक्रापूरसह परिसरातील मुस्लिम बांधवांना केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता सभेचे आयोजन केले होते. यावेळी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करत असताना संतोष गिरीगोसावी बोलत होते. याप्रसंगी शिक्रापूर जामा मस्जिदचे अध्यक्ष शिराजभाई शेख, तळेगाव ढमढेरे मस्जिदचे अध्यक्ष मुनीरभाई मोमीन, कोरेगाव भीमाचे हबीब सय्यद, समीर इनामदार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, यासीन तांबोळी, रफिक तांबोळी, समीर बागवान, परवेज तांबोळी, महम्मद तांबोळी, कोरेगाव भीमाचे पोलीस-पाटील मालन गव्हाणे, रामदास गव्हाणे, मुन्नाभाई तांबोळी, आमीर तांबोळी यांसह आदी उपस्थित होते. यावेळी गिरीगोसावी म्हणाले, या भागामध्ये प्रत्येक सणामध्ये सर्व धर्माचे नागरीक एकत्र येतात ही आनंदाची बाब असून सर्वांनी एकोप्याने सण साजरे करावेत. काही अडचणी असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. रमजान ईद,नमाज पठनच्या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगत सर्व धर्मियांनी एकत्र येऊन सर्वधर्म समभाव जपण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच पोलिसांकडून संपूर्ण मदत आणि सहकार्य करण्यात येणार आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. तर पोलीस नाईक ब्रम्हा पोवार यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)