रमजान ईदच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी गर्दी

शिरखुर्मासाठी लागणाऱ्या साहित्याला मागणी

पुणे – शनिवारी रमजान ईद आहे. या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम धर्मियांच्या घरोघरी तयारीने जोर धरला आहे. शिरखुर्मा तयार करण्यासाठी स्पेशल मसाला आणि सुकामेव्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. शिरखुर्मासाठी लागणाऱ्या वस्तुंचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथील भुसार बाजारात शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या काजू, बदाम, चारोळी, पिस्ता, केशर, तूप, शेवया आदी साहित्यांची आवक वाढली आहे. शिरखुर्मा हे ईदचे खास वैशिष्टय आहे. शिरखुर्मा बनविण्यासाठी ग्राहकांकडून यंदाही खुलताबादी शेवयांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात स्पेन आणि काश्‍मीर येथून केशर, अमेरीकेतील कॅलिफोर्नियातून बदाम, इराणमधून पिस्ता, गोवा तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश येथून काजू आणि छत्तीसगढ, मध्यप्रदेशमधून चारोळीची आवक होत आहे. ईदमुळे येत्या दोन दिवसांत या पदार्थांना मागणी कायम राहणार आहे. सध्या बाजारात काजूच्या प्रतिकिलोस 800 ते 1300, बदाम 680-1000, चारोळी 600-1000, पिस्ता 1240 ते 2000, किसमिस 220-500, शेवया 50 ते 70 तर केशरच्या प्रतिग्रॅमला दोनशे ते अडीचशे रुपये भाव मिळत आहे. सणानिमित्त नातलगांना भेट देण्यासाठी शिरखुम्याच्या साहित्यांचे गिफ्ट हॅम्पर बाजारात उपलब्ध झाले आहे. यामध्ये, तूप, काजू, बदाम, चारोळी, पिस्ता, शेवई आणि केशर आदींचा समावेश आहे. पाव किलो पासून किलोपर्यंत तयार असेलेल हे गिफ्ट हॅम्पर 300 ते 2 हजार रुपयांना मिळत आहे. ईदनिमित्त येत्या दोन दिवसात बाजारात एक ते दीड कोटींची उलाढाल होण्याची शक्‍यताही व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)